Video: पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिच्या हत्येबाबत आरोपी म्हणाला…

पुणे: पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या युवतीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा याने चाकूने वार करत मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनौजा याने कारण सांगितले आहे.

कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवले आहे. पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी केली जात असून त्यामधून या हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपशील समोर येत आहे. कृष्णा कनौजा तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, ‘शुभदा हिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलिस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते.’

शुभदा कोदारे हिने आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णा याने शुभदा हिला चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो शुभदाकडे सतत पैशांची मागणी करीत होता; पण शुभदा पैसे परत देत नव्हती. त्यामुळे कृष्णा आणि शुभदा यांच्यात कामाच्या ठिकाणी वादही झाला होता.

शुभदा कोदारे हिने सहकारनगर पोलिस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…

पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!