पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

नागपूर: नागपूरच्या कळमना पोलिस चौकीमध्ये काही पोलिस कर्मचारी चक्क सिगारेट ओढताना आणि जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. संबंध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओत दिसणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कळमना पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी वर्दीवर सिगारेट ओढत असून जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर कळमना ठाण्यातील या व्हिडीओमध्ये दिसणारे पोलिस कर्मचारी मनोज घाडगे, भूषण साखळे या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी ही कारवाई केली आहे. ही चित्रफीत जुनी असल्याचा पोलिसांना संशय आहे, पण वर्दीवर असताना जुगार खेळल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पोलिसांनी पोलिस चौकीमध्येच जुगाराचा डाव मांडला आहे. पोलिस पत्ते खेळताना दिसत आहेत. वर्दीमध्ये असलेले पोलिस जुगार खेळत आहेत. ते यावेळी धुम्रपान करताना देखील दिसत आहेत. पोलिस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच पोलिस जुगार खेळत असल्याने खळबळ उडाली आहे.

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…

न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…

धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!