पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…

पुणे : पुणे शहरातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला असुन, आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पुणे शहरातील कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडला. आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यावेळी झालेल्या विचित्र अपघातात अनेक महागड्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय गाडी चालकांनीदेखील ट्रक चालकावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.दरम्यान, नवले पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!