
बीड! फेसबुक लाईव्हदरम्यान रीलस्टारच्या अंगावरुन गेली ट्रॅक्टरची ट्रॉली…
बीड: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका ऊसतोड कामगार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गणेश डोंगरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. गणेश डोंगरे हा सोशल मीडियावरील रीलस्टार होता आणि दुर्दैवाने त्याची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी ऊसतोडणीचे काम करत होते. गणेश डोंगरे हे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र, ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ एक एकर जमीन होती. वृद्ध आई-वडील असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गणेश यांच्या खांद्यावर होती. तीन मुलींचे पालनपोषण, आई-वडिलांची जबाबदारी आणि वाढता खर्च यामुळे गावाकडील उत्पन्न अपुरे पडत होते. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून हे दाम्पत्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ऊसतोडणीचे काम करत होते.
लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याच वेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक कामगार जखमी झाला. काही क्षणांतच अश्विनीच्या डोळ्यांसमोर होत्याचे नव्हते झाले.
अपघाताच्या वेळी अश्विनी या फेसबुकवर लाईव्ह होती. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली. पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
रील्स स्टार अथर्व सुदामे याला नोटीस; पाहा रिल्समधील संवाद…
हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…
धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…
Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…

