शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले होते. लाचखोर डीन विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची तोडफोड केली आहे. शिवाय, डीनच्या खुर्चीला नोटांचा हार घातला.

पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले होते. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे, शिक्षणाच्या महेर घरात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला तबल 10 लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांनी 16 लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना पकडण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मनसेच्या विद्यार्थी सेनेने आंदोलन पुकारले होते. त्यावेळी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता. कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यालयाची तोडफोड केली. खुर्च्या उलट्या करुन तोडण्याचा प्रयत्न केला. कार्यलयाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खुर्च्याही त्यांनी तोडल्या आहेत.

दरम्यान, आशिष श्रीनाथ बनगिनवार हे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचे डीन आहेत. दरम्यान तक्रारदाराचा मुलगा नीट परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून निवड झाली होती. अशिष यांनी प्रवेश फी व्यतिरिक्त 16 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 10 लाख रुपये घेताना अशिष यांना रंगेहाथ पडकले होते.

पुणे शहरातील वकिलास दंडासह दोन वर्षे कारावासाची शिक्षा…

पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…

वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!