पुणे शहरातील वकिलास दंडासह दोन वर्षे कारावासाची शिक्षा…

पुणे (संदीप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

फिर्यादी वंदना विजय आडसुळ या शिवाजीनगर कोर्ट नं ०३ येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल, आरोपी अॅड राहुल रमेश माडेकर व मयत आरोपी विद्या संपतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादीकडुन सदर केसची फाईल दिनांक २५/०१/२०१२ रोजी १६ / ३० वाजेच्या सुमारास कोर्ट क्रमांक ०३ शिवाजीनगर येथून पाहणेकरीता मागितली असता ती फिर्यादीने विश्वासाने आरोपींना ताब्यात दिली. आरोपींनी परत देतो असे म्हणून परत दिली नाही. म्हणुन सदरबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे वरील दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा रजि नं. ३८/२०१२ भादवि कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास श्री. चव्हाण, सहा पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. दाखल गुन्ह्यातील आरोपी विद्या संपतराव साळुंखे या दरम्यानच्या काळात मयत झाल्या. सदर कामी सरकार पक्षाने एकुण ०७ साक्षीदार तपासले. ०४/०८/२०२३ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे न्यायालयात आरोपीतांविरुध्द गुन्हा शाबीत झाला व त्यात आरोपीत अॅड राहुल रामेश माडेकर यास २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये ५०००/- दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

सदर कामी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. तसेच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे कोर्ट पैरवी अंमलदार सपोफौ मोहन भापकर, कोर्ट अंमलदार पोहवा. ५७२० सोनवणे, मपोशि. ९३११ बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहिले.

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!