
Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…
कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या वाळवंटात ट्रेकिंगसाठी गेलेले एक जोडपे वाळवंटात वाट चुकले होते. वाळवंटादरम्यान जवळचे पाणी संपल्यानंतर तहानलेली महिला बेशुद्ध पडते. मैत्रिणीला उन्हापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मित्र सावलीच्या रूपात झोपलेला दिसत आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ ऑफिस, ज्याने या जोडप्याला वाचवले, ते म्हणाले की, ‘वाळवंटात चुकलेल्या व्यक्तीने 911 वर कॉल केला आणि पोलिसांना सांगितले की त्याची मैत्रीण खूप अशक्त झाली आहे. तिला डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पाठवले. जेव्हा बचाव कर्मचारी जोडप्यापर्यंत पोहोचले तेव्हा दोघेही कोरड्या जागी पडले होते.’
View this post on Instagram
रिव्हरसाइड काउंटी शेरिफ ऑफिसच्या एव्हिएशन युनिटने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टर जमिनीवर पडलेल्या जोडप्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, संबंधित व्यक्ती आपल्या प्रेयसीला उन्हापासून वाचवण्यासाठी तिच्या अंगावर पडून आहे. हा बचाव 9 जून रोजी करण्यात आला.
बचाव कर्मचाऱ्यांनी आधी त्या व्यक्तीला आणि नंतर त्याच्या बेशुद्ध मैत्रिणीला वाचवले. युवतीची प्रकृती खूपच खराब होती, त्यामुळे वैद्यकीय सुविधा असलेले दुसरे हेलिकॉप्टर बचाव स्थळी आणण्यात आले जेणेकरुन तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात येईल. दरम्यान, त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 41 भारतीयांचा मृत्यू…
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…
Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…