
पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…
पुणेः पिंपरी चिंचवडमधील एका गोदामाला सोमवारी (ता. २२) रात्री उशिरा आग लागली आणि क्षणात या आगीने रौद्र रुप धारण केले. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.
वाल्हेकर वाडी परिसरातील गोदामाला रात्री उशिरा आग लागली होती. पोटमाळ्यावर अडकून पडल्याने आगीत ललित अर्जुन चौधरी (वय 21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले असून, मोठं नुकसान झाले आहे. शिवाय, दोन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या. आगीत पोटमळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
कडाक्याच्या थंडीमुळे रुम हिटर लावला अन् 6 जणांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

