हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

बीड : आलापूर (ता. माजलगाव) येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामभाऊ शहाणे असे मृत्युमुखी पडलेल्या अंध वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आलापूर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात एका पत्राच्या शेडमध्ये राहत होते. रुक्मिणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग वेगाने पसरली आणि संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेले. या आगीमध्ये रामभाऊ शहाणे यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घराला आग लागल्याची माहिती मिळताच गावकरी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, आगीच्या लोटामुळे अंध असलेल्या रामभाऊ यांना शेडच्या बाहेर येता आले नाही. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी शेडमध्ये मृत्यू झाला. यामुळे उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!