
बीड! प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट; मला खूप मारले, चोरटा म्हटले…
बीड: प्रेमसंबंधांच्या वादातून एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर याला गावात बोलावून घेतले. त्यानंतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनाम केल्याचेही समोर आले आहे.

मारहाणीमुळे आणि सार्वजनिक बदनामीमुळे ज्ञानेश्वर गंभीर मानसिक तणावाखाली गेला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने, ‘मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तुला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या,’ असा उल्लेख केला आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वर याने धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वरच्या आईने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, ‘माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओही काढण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.
बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…
बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…
बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…
माझ्याशी बोल, तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर…
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…

