नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…

नाशिक: नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून एका विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. महिलेने सातपूर पोलिस स्टेशन समोरच हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

नाशिकच्या सातपूर परिसरातील एका विवाहित महिलेने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सातपूर पोलिस स्टेशन समोर येत महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या प्रियकराचे नाव टाकून तीने सुसाईड नोटही लिहिली आहे. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करताच सातपूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

विवाहितेने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, तिचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. प्रियकराने प्रेमाचा विश्वास दाखवून महिलेकडून एक लाख रुपये घेतले. त्यामुळे महिलेच्या आई वडिलांनी आणि मुलाने नातं तोडल्याने महिला प्रियकराच्या घरी राहायला गेली. पण प्रियकराची आईने महिलेला तू माझ्या मुलाशी लग्न कर, पण पहिले तुला तुझ्या मुलाला सोडावे लागेल. नंतर प्रियकराकडून मी तुझ्या नावावर घर करतो, अशी बतावणी करण्यात आली. मात्र प्रियकराने विवाहितेला सोडून दिले. प्रियकराने सोडल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!