प्रेयसीच्या आत्महत्येनंतर पोलिस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…

मुंबई: प्रेयसीने (वय २३) गेल्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर अंबोली पोलिसांनी बुधवारी ठाण्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये तिने आरोपी समय प्रशांत दळवी (वय 24) हा तिच्यावर दबाव टाकत तिला दोनदा गर्भवती करत दोन्ही वेळा तिचा गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अंबोली पोलिसांनी दळवीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मृत युवतीच्या कुटुंबीयांनी आरोपी दळवी आणि तिच्या लग्नासाठी त्याची काकू आणि त्याच्या बहिणीशी चर्चा देखील केली होती. परंतु त्यांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर युवतीने 23 मार्च रोजी अंधेरी पश्चिम येथील तिच्या घरी आत्महत्या केली. मृत पीडितेच्या बहिणीने तिचा फोन तपासला तेव्हा तिला त्यात दळवीच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, परंतु तिने तो पाठवला नाही; मात्र व्हिडीओ डिलीट होऊ नये म्हणून तो दळवीला पाठवला, असे तिच्या बहिणीने पोलिस तक्रारीमध्ये म्हटले आहे.

युवतीने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या दळवी सोबत असलेल्या नात्याबद्दलचा घटनाक्रम आणि मानसिक छळाबद्दल सांगितले आहे. शिवाय, डायरीत लिहिलेले तीन पानांचे पत्रही तिच्या कुटुंबाला सापडले आहे. लेकीच्या आत्महत्येनंतर आईची तब्येत बिघडल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात उशीर झाल्याचे देखील कुटुंबीयांनी म्हटले आहे. पीडितेच्या आईच्या जबाबावरून दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दळवीचे गेल्या 4 वर्षापासून तिच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. यातून ती दोनदा गर्भवती राहिली, परंतु त्यांचे लग्न उशिरा होत असल्याने, त्याच्या सांगण्यावरून तिला दोन गर्भपात करावा लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेत संपवली जीवन यात्रा…

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…

प्रेमकहाणीचा ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने झाला शेवट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!