नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…

मुंबईः प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शुक्रवारी (ता. ४) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली.

नितीन देसाई यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. नितीन देसाई यांना त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने खांदा दिला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. पण ज्या नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांची फ्रेम न फ्रेम जिवंत केली, त्या हिंदी सिनेमांच्या दुनियेतल्या आमिर खान, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर आणि संजय लीला भन्साळी यांच्याखेरीज एकही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित नव्हता.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह मराठी सिनेइंडस्ट्रीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल साने यांनी अंत्यदर्शन घेतले. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाले.

नितीन देसाई यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यांनी एका चिठ्ठीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की, माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा. ‘जोधा अकबर’ चित्रपटाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

‘देवदास’,’जोधा अकबर’,’हम दिल दे चुके सनम’,’लगान’,’प्रेम रतन धन पायो’,’फॅशन’,’ट्राफिक सिग्नल’ अशा अनेक चित्रपटांना नितीन देसाई यांनी आपल्या सेटमधून जीवंत रुप दिले आहे. चित्रपटाच्या यशात त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असायचा. सेट तयार करण्यापासून ते शूटिंगचं पॅकअप करेपर्यंत देसाई सेटवर उपस्थित असायचे. पण, त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत बॉलिवूड नसल्याचे दिसले. कुठे आहे ‘देवदास’मधला शाहरुख खान? कुठे आहे ‘हम दिल दे चुके सनम’मधला सलमान खान? कुठे आहे ‘जोधा अकबर’मधला ऋतिक रोशन? कुठे आहे कपूर परिवार? ज्या देसाईंनी चित्रपटाच्या पडद्याला चार चाँद लावले, बॉलिवूडला भरजरी श्रीमंती दिली त्याच नितीन देसाई यांच्याबाबत बॉलिवूडकरांची दिसलेली संवेदनशीलतेची गरिबी याला कृतघ्नपणा म्हणावा की दुर्दैव, अशी चर्चा सुरू आहे.

नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…

नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!