
सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…
सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात. चार दिवसापूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता, सहा वर्षांचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते. गेल्या चार दिवसांपासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. निलेश व प्राजक्तामध्ये वाद झाल्यानंतर मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला.
मंगेश कांबळे याने प्राजक्ता हिचा खून केल्यानंतर मृतदेह बाजूच्या खोलीत घर मालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून झाकून ठेवला. त्यानंतर मंगेशने खोलीला बाहेरून कुलूप लावले. मंगेशने त्याचा भाऊ निलेशला फोन करुन मी शिराळ्याला जाणार असल्याचे सांगितले. गाडी घेऊन ये, असा निरोप भावाला दिला. त्यानंतर मंगेशचा भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. यादरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याची विचारपूस केली. तेव्हा सहा वर्षाच्या शिवमने मम्मी-पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले.
शिवमने सांगितलेला प्रकार ऐकून निलेशने त्याचा भावाला फोन करुन कुठे आहेस विचारले. यावर मंगेशने आपण प्राजक्ताचा खून केल्याची कबुली दिली. तेव्हा या तिघांनीही मंगेशला पोलिसांसममोर आत्मसमर्पण करायला सांगितले. त्यानंतर आरोपी मंगेश कांबेळे स्वतः शिराळा पोलिसांत हजर झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन…
माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले…
पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…
धक्कादायक! झोपेत असताना पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या..

