पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…

पुणे : पुण्यात भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ गणेशवाडी परिसरात अपघाताची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित सुरेश पवार (वय ३६) आणि सुरेश प्रभाकर पवार (वय ६२, दोघे रा. ट्रिनिटी सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात अभिजित यांची पत्नी प्रणिता पवार, पुतण्या रियांश पवार आणि आई सुलोचना पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. अन्य जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजित सोमवारी दुपारी कुटुंबीयांसह कोलवडी ते थेऊर फाटा रस्त्याने मोटारीतून निघाले होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या मोटारीला धडक दिली. या अपघातात मोटारीतील अभिजित आणि वडील सुरेश पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीवरून डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३, रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.

दरम्यान, डंपरचालकांकडून बेदरकारपणे वाहने चालवून इतरांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा असाच अपघात या परिसरात झाला होता.

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!