
पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांमुळे दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून पोलिसांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले.
बेपत्ता झालेल्या आईला आळंदीपासून ते बुलढाण्यातील शेगाव पर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्याने दाखविलेला फोटो आपल्या आईचाच असल्याची खात्री झाली. त्याने थेट तळवडे गाठले अन् तिथेच मायलेकाची भेट झाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
गौतम आकाराम वानखडे हे आळंदीमध्ये मोलमजुरीचे काम करतात. त्यांची आई (वय ८०) दीड वर्षांपूर्वी मुलाकडे देवाची आळंदी येथे आली होती आणि तेथूनच बेपत्ता झाली होती. आईचा फोटो नसल्यामुळे गौतम यांनी पोलिसांमध्ये आई हरवल्या बाबतची तक्रार दिली नव्हती. त्यानंतर हरविलेली आई गावी गेली असेल अशी शक्यता गृहित धरून गौतम यांनी त्यांच्या मूळगावी शेगाव आणि आळंदी, पुणे परिसरामध्ये आईचा खूप शोध घेतला. परंतु, आईचा शोध लागत नव्हता.
तळवडे वाहतूक विभागाची नेहमीप्रमाणे आयटी पार्क चौक येथे शनिवारी (ता. 26) नाकाबंदी सुरू होती. नाकाबंदी दरम्यान कारवाईसाठी थांबवलेल्या एका वाहन चालकाने आयटी पार्क चौकात कॉर्नरच्या एका हातगाडीवर मागील दीड वर्षांपासून राहणाऱ्या एक वृद्ध महिलेला ओळखले. त्यांनी ही बाब पोलिस हवालदार राजू भोसले यांना सांगितली. भोसले यांनी त्या वाहन चालकाकडून वृद्ध महिलेच्या मुलाचा म्हणजे गौतम वानखडे यांचा मोबाइल नंबर घेतला. त्यावर संपर्क साधून सापडलेल्या वृद्ध महिलेबाबत माहिती देऊन त्याचीच आई असल्याची खात्री पटविली.
आई मिळाल्याची माहिती मिळताच मुलाने थेट तळवडे गाठले. आईला पाहताच त्यांनी आईला मिठी मारली. वृद्ध महिलेने देखील आपल्या मुलाला आळखले. त्या दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य पाहून पोलिसांसह उपस्थित असलेल्यांचेही डोळे पाणावले. मागील दीड वर्षांपासून वाहतूक पोलिस, तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कामगारवर्गाने या वृद्ध महिलेला जेवण, कपडे देत वेळोवेळी औषधोपचारही केले होते.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक मधुकर थोरात, पोलिस हवालदार राजू भोसले यांच्या समसूचकतेमुळे दीड वर्षांपूर्वी हरवलेल्या वृद्ध महिलेचा शोध लागला. यामुळे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्ह्यात मित्राला जमिनीत खड्डा करुन पुरले; पोलिसांनी घेतला शोध अन्…
न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिचा शोध घेण्यात पाच वर्षांनी पोलिसांना यश…
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…
पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

