महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले होते. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे याला दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची कुनकुन 2023 मध्ये कुटुंबाला लागली होती, त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला, मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या असा पावित्रा शाळेने घेतला होता. शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेने घेतली होती. मात्र, 17 मे रोजी मुलीने आत्महत्या केली. काही दिवसानंतर आई मुलीचे दप्तर पाहत होती. तेव्हा त्यात स्मार्टवॉच आढळले. डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता. अजयनेच ते बळजबरीने दिल्याची आईला खात्री पटली. मुलीकडे दोन पत्रेदेखील आढळली. अजयने नेहाला बळजबरीने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. आईने अखेर दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारधे यांनी त्याला अटक केली.

अल्पवयीन मुलीला डायरी लिहायची सवय होती. तिने इंग्रजी, मराठीत तिच्या डायरीत शिक्षक अजयबद्दल लिहिले होते. मम्मी, सर घरी आले होते, मी तुला सांगू शकले नाही असे त्या डायरीत लिहिल्याचे आढळले आहे. अजयने तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर मुलीने असं आयुष्य संपवल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…

एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!