
कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव तर प्रशांत पाटील असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या प्रशांत पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत पाटील याने सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नी रोहिणी प्रशांत पाटील (वय २८, रा. भादोले, ता. हातकणंगले) यांच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर पती प्रशांत हा फरार झाला होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी समवेत तिच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होता. सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती-पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटारसायकलने येत होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…
कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…
कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

