नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…

नाशिक : नाशिकमध्ये माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व त्यांचे बंधू किरण खर्जुल आणि दीपक खर्जुल यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

अल्पवयीन मुलांचे एक टोळकं रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना दहशत माजवत होते. या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक म्हणून खर्जुल यांच्याकडे तक्रार केली होती. या टोळक्याला समज देण्यासाठी गेलेल्या खर्जुल कुटुंबियांवरच या टोळक्याने हल्ला केला.

या घटनेत खर्जुल कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…

नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…

नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!