नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिक : नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले असून, त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई सुरवात केली आहे.

शहरामधील शाळा-महाविद्यालयांत परीक्षा सुरू असताना कॉलेजरोड व गंगापूररोड परिसरातून कर्णकर्कश आवाज करीत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. २२ सायलेन्सर जप्त केले आहेत. शिवाय, या दुचाकीस्वारांकडून २१ हजारांचा दंडही वसूल केला आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी मोठ्या आवाजात सायलेन्सर असलेल्या दुचाकींवर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याच्या पथकांनी कॉलेजरोड, महात्मानगर, गंगापूररोड, डी. के. नगर, सावरकरनगर भागात नाकाबंदी केली. त्यावेळी बावीस दुचाकीस्वारांवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. सात दुचाकींविरुद्ध ‘आरटीओ’मार्फत कारवाई करण्यात आली. या सर्व दुचाकीचालकांकडून एकवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही पोलिसांची कारवाई सुरू राहणार आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर सुरक्षित राहण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या असून, नागरिक त्यांचे स्वागत करत आहेत.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!