नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षाच्या चिमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दिव्या त्रिपाठी असे मृत मुलीचे नाव आहे. दिव्या इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली. या सगळ्या प्रकारानंतर या मुलीला जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दिव्या हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, मात्र ब्रेंनस्ट्रोक किंवा हार्ट-अटॅक मुळे या मुलीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, दिव्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका: संदिप कर्णिक

नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…

नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!