
नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय पंडित देवडे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाच्या मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी-शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.
संजय देवडे हे नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कामावर रूजू होते. शाळेच्या परिसरात असलेल्या क्वाटरमध्ये ते वास्तव्य करीत होते. दरवाजा रात्रीपासून बंद असल्याने नेमके संजय देवडे गेले कुठे असा प्रश्न पडला होता. आज सकाळी दार उघडून पाहिल्यावर शिक्षकाने गळफास लावून आयुष्य संपवल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
संजय देवडे यांनी गळफास घेण्यापुर्वी एक चिठ्ठी देखील लिहली होती. या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येमागेचे कारण सांगितले आहे. चिठ्ठीत कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संजय देवडे यांचा काही दिवसांपूर्वी पत्नी सोबत वाद झाला होता. या वादानंतर शाळेच्या क्वाटरमध्ये ते एकटेच राहत होते. या दरम्यान त्यांना मानसिक तणाव देखील आला होता. याच तणावासून आणि कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तो शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सावंगी पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे करत आहेत.
लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार हिम्मतराव भोईटे यांचे निधन
सैराट! वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…
चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…

