
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
चेन्नईः तामिळनाडूतील सेलम पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक केली. आरोपीकडून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात महिला आणिविद्यार्थिनींचे 50 हून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयराजा (वय 50) हा वाझपडीजवळ जादूटोणा केंद्र चालवत होता. तो विधी आणि जादूटोणा करण्याच्या नावाखाली लपवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करून महिला आणि मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि नंतर ते डार्क वेबवर विकायचा. आरोपीकडून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात महिला आणि विद्यार्थिनींचे 50 हून अधिक व्हिडिओ आहेत. काही महिलांना गुंगीचे औषध मिसळलेले पाणी किंवा प्रसाद दिला जात असे आणि त्या बेशुद्ध असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते.
View this post on Instagram
विनायक चतुर्थीसाठी देणगी गोळा करायला आलेल्या एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. घाबरलेल्या विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर, कुटुंबीय आणि स्थानिक तरुण त्याच्या ‘शनेश्वर’ नावाच्या केंद्रावर गेले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. गर्दी पाहून आरोपीने परिसर बंद केला आणि तो पळून गेला. तो जवळच लपून बसल्याचे स्थानिकांना नंतर समजले आणि त्यांनी त्याला पकडून वाझपडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पूर्वी एका भांड्यांच्या कारखान्यात काम करत होता. तो कारखाना बंद झाल्यावर, तो बाबा आणि गूढविद्येतील तज्ञ असल्याचे भासवू लागला. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की एक वेबसाइट त्याला अशा व्हिडिओंसाठी पैसे देत असे. तो महिलांचे व्हिडिओ बनवून त्या वेबसाइटवर पाठवत असे. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात इतर कोणी व्यक्ती किंवा नेटवर्क सामील होते का, याचा तपास करत आहेत. आरोपीचा मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…
पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

