सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिस बॉय विरोधात गुन्हा दाखल आहे, हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्याने सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने नाशिक क्राईम ब्रँचकडून डीव्हीआर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला असून या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे. याचदरम्यान, अशोक खरातबाबत विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जोडप्यांना समोर बसवून पत्नीमुळेच यशस्वी झाल्याचे पतीला सांगून तो महिलेच्या मनात सहानुभूती तयार करायचा. तसेच अशोक खरात हा मोठे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा. त्यासाठी तो अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे भासवायचा, असेही तपासादरम्यान समोर आले आहे. ज्या केबिनमध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा, त्या केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबरचा लाइट आतून बंद करीत असे. या झुंबरातील लाइट बंद तोपर्यंत चेंबरमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, हा त्याचा अर्थ असे. त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना ही सांकेतिक भाषा माहिती होती, असेही चौकशीत समोर आले आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अशोक खरात याच्याकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरात याच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, अशोक खरात याच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे.

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!