Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.

जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…

जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…

Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!