धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…

नांदेड : वडिलांनीच विवाहित मुलगी व तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याची घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, गावातून हातात दोरी बांधून मुलीची व मुलाची धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे.

नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात हत्येची घटना घडली होती. विवाहित प्रेयसीच्या सासरी भेटायला गेलेल्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर मुलीचे वडील, काका व आजोबांनी मुलीची सासरीच गावातून धिंड काढली. याप्रकरणी मुलीचे आजोबा, काका आणि वडिलांना 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून, जीव घेऊन, हात-पाय बांधून विहिरीत ढकलून दिले होते. नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव, (ता. उमरी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली आहे, मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.

संजीवनी कमळे (वय 19, रा. गोळेगाव) व लखन बालाजी भंडारे (वय 19, रा. बोरजुनी) असे या घटनेतील मृत युवक व युवतीचे नाव आहे. दोघांचे गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका युवकासोबत झाला होता. विवाहानंतर दोघांच्या गाठीभेटी सुरू होत्या. मृत युवतीचे वडील, काका, पती, सासू-सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…

प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…

पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!