
अनैतिक संबंध! प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीला रिक्षात बसवलं अन्…
लातूर : एका महिलेने आपला प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहरात घडली आहे. आरोपी महिलेनं दवाखान्यात जायचं असल्याचं सांगून पतीला जबरदस्तीने रिक्षात बसवून एका निर्जन स्थळी आणलं आणि याठिकाणी पतीची निर्घृण हत्या केली. पण मयताचा मुलगा आणि मुलीने दिलेल्या जवाबामुळे हे हत्याकांड उडकीस आलं.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली. हनुमंत शरणप्पा जनवाडे (वय ४०) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. पूजा जनवाडे आणि तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत यांची पत्नी पूजा जनवाडे आणि तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील यांनी त्यांच्या अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याने कट रचून गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ४ ते ६:३० या वेळेत हत्या केली. यासाठी त्यांनी आणखी तीन अनोळखी पुरुषांची मदत घेतली. मृत हनुमंत यांना त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने “डोळ्याच्या दवाखान्यात दाखवून येऊ” असे सांगून ऑटोमध्ये बसवून नेले. उदगीर शहरातील नांदेड रोडवरील मोरे आय हॉस्पिटलजवळ आल्यावर पत्नी ऑटोमधून उतरली आणि प्रियकर सुनील व त्याच्या मित्रांनी हनुमंत यांना जवळच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे काठीने बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर, ठरल्याप्रमाणे पत्नी घटनास्थळी परत आली आणि तिने पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
आरोपी महिलेनं सुरुवातीला आपल्या पतीला कोणीतरी मारल्याचा बनाव केला. मात्र, रात्रभर केलेल्या तपासादरम्यान, पोलिसांना मृत हनुमंत यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने आणि चौथीत शिकणाऱ्या मुलीने महत्त्वाची माहिती दिली. मुलांच्या माहितीवरूनच या खुनाचे बिंग फुटले. यानंतर पोलिसांनी मृताचा भाऊ विनोद धनराज जनवाडे यांच्या फिर्यादीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पूजा हनुमंत जनवाडे (वय ३५), सुनील उर्फ पिंटू पाटील आणि इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी, पोलिसांनी पूजा आणि सुनील यांना अटक केली असून, ऑटोचालकासह अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करत आहेत.
‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून…
हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…
धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…
नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…
प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…

