पत्नीने नवऱ्याला त्याच्या मित्रासमोरच मारले अन् पुढे नको ते घडले…

अमरावती : पतीने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढल्यामुळे पत्नी चिडली आणि पत्नीने पतीच्या मित्रासमोरच पतीला अपमानित केले होते. नवऱ्याच्या भावना दुखावल्या आणि त्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकलविहीर येथे पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. आरोपी शालीकराम धुर्वे हा गावातील गुरे चारण्याचे काम करतो. त्यातून मिळणारे सगळे पैसे तो त्याची पत्नी नीला धुर्वे हिच्याकडे द्यायचा. सगळे पैसे नेहमी तिच्याकडेच असायचे. शालिग्रामने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढले. जेव्हा ही बाब नीला धुर्वे हिला कळाली तेव्हा ती भडकली. यानंतर पत्नी नीला धुर्वे हिने पती शालिकराम धुर्वे याला मित्रासमोरच मारून अपमानित केले होते.

पत्नीने मित्रासमोरच मारल्याने पतीला राग अनावर झाला आणि त्यामुळे आरोपी शालिकराम धुर्वे यानी पत्नीची गळा चिरून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह जंगलात नेऊन फेकल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. आरोपी पती शालिग्राम धुर्वे याला वरुड पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…

डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!