यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपी अतुल आनंदराव जगताप, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब सयाजी चव्हाण यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश – 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण (40), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल जगताप (45), सचिन जगताप (45) सर्व रा. शिवाजी नगर व राजेंद्र वरटकर (53, दस्त नोंदविणे) भाग्योदय सोसायटी, यवतमाळ आदीं विरुद्ध भादंवि कलम 420, 120 (ब), 468, 471, 474, 34 अंतर्गत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी (51) यांच्या लेखी तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील आरोपी सद्या फरार असून अवधूतवाडी पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करित आहे.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची ₹ 10 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणित हेतूने कर्जासाठी तारण/गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ यांच्या संगनमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅक, सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!