
बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…
बुलडाणा (भागवत गायकवाडी): बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथून शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास 6 जनावरं चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांची मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौथा येथील 1) विनोद नारायण गायकवाड यांच्या गोट्यातुन एक गाय व त्यांचे बंधू सरपंच चौथा 2) गजानन नारायण गायकवाड यांचा एक गोर्रा व 3)विष्णू संतोष गायकवाड यांची एक गाय व 4)ऊत्तम संतोष गायकवाड यांची एक गाय व 5)त्रंबक कुंडलीक गायकवाड यांची एक गाय व 6)आमोल हिवाळे पाडळी यांची एक गाय असे मिळून 6 जनावर चोरट्यानी रात्रीच्या आंधाराचा फायदा घेऊन गोठ्याचे कुलूप तोडून जनावर चोरून नेल्याची घटना घडली आहे.
चौथा येथे आज सकाळी गुरांचा चारापाणी करण्यासाठी गोट्यावर गेले असताना घटना उघडकीस आली आहे. कुलूप तुटलेल बघुन आत मध्ये जाऊन पाहिल्यानंतर गाय चोरीला गेल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे शेतकर्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीला गेलेली जनावरे कुणाला आढळल्यास सरपंच चौथा गजानन गायकवाड (मो.नबंर 9975242778) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केली आहे.
हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…
माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…
चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…
पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास…
हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

