
पुणे! मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकवणारा १२ तासाच्या आत ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. शिवाय, २,५०,०००/- किंमतीचे २ तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड केला आहे.
फिर्यादी महिला १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा.चे सुमारास हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिराजवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर फिर्यादी मॉर्निग वॉक करीत होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले त्या बाबत अनोळखी चोरटया इसमाविरूध्द सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं.१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील पोलिस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलिस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावरुन गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलवरी बॉय म्हणून फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा गणेश चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे थांबलेला आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी गेल्यानंतर आरोपी पळून जावू लागला. सोबतचे स्टाफचे मदतीने थोडयाच अंतरावर पकडून ताब्यात घेवुन
त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अमोल किसन नाकते (वय २७ वर्षे सध्या रा. समता कॉलनी, प्रेरणा शाळेमागे, गणेश चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे मुळ रा.मु. पिंपरी पोस्ट गुंजवणे ता. वेल्हा जि.पुणे) असे असल्याचे सांगितले.
आरोपीलकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत असताना त्याने सांगितले की, ‘मी सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठार धनकवडी भागात स्विगीचे डिलवरी बॉय म्हणून फिरण्याचा बहाणा करीत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती. त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मी तेथुन पळून गेलो असे सांगितले.’ सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं.१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९(६) हा गुन्हा उघडकीस आला असून सदर आरोपी कडुन एकुण ९०,०००/- रूपये किंमतीचे २ तोळे सोने वगुन्हा करतेवेळी वापर केलेली एक दुचाकी गाडी किमंत रुपये ६०,०००/- रुपये व सदर सोने गहाण ठेवून मिळालेली रक्कम १,००,०००/- रुपये असा एकुण २,५०,०००/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक २०/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी दिली असुन अधिक तपास सहकारनगर पोलिस ठाणेकडील सपोनि सागर पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग मनोज पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक सागर पाटील, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदिप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड यांनी केली आहे.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल…
गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

