पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी…
मुंबई : मुंबईमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू रहाणार आहेत.
दिवाळी निमित्ताने नागरीक मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत असल्याने अन्य नागरीकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. मुंबईत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस पोलिस आयुक्तांनी नियुक्त केलेल्या किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगी, परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे, वाहतूक करणे यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरीकांनीही पोलिसांच्या या आदेश आणि सुचनांचे पालन करुन कोणालाही त्रास न होता आनंदाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
फ्लाइंग कंदीलवरही बंदी…
मुंबई पोलिसांनी ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत मुंबईत फलाईंग कंदील वापरणे, विक्री करणे आणि साठवणूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शांतता व सुरक्षितता यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल.
मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…
पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…
मराठा आंदोलन! पोलिस आता अलर्ट मोडवर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!