माणुसकीला काळीमा! बलात्कारानंतर मृतदेहाचे केले चार तुकडे….

लखनौ (उत्तर प्रदेश): एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांदा जिल्ह्यात घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महिलेच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आले. पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतले आहेत. आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या घटनेबाबत ट्विट केले आहे.

गावातली पीडित महिला पिठाच्या गिरणीवर सारवण आणि भिंती लिंपण्याच्या कामासाठी गेली असताना ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राजकुमार शुक्ला आणि त्याचा भाऊ बउवा शुक्ला यांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत असल्याने या महिलेची 20 वर्षांची मुलगी काही वेळानंतर तिथे पोहोचली. तिने गिरणीचे दार वाजवले. ‘काही वेळानंतर गिरणीची दार उघडले. त्या वेळी मला आईचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसला. तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले होते,’ असे तिच्या मुलीने तपासादरम्यान सांगितले.’

दरम्यान, राजकुमार शुक्ला, त्याचा भाऊ बउवा शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला यांच्याविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…

संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…

मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!