
पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…
कोच्ची (केरळ) : कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलिस उपनिरीक्षक बाबूराज (वय ५५) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
बाबूराज यांची एका आठवड्यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी शंका वर्तवण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबूराज यांचा बुधवारी (ता. 27) मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. एका आठवड्यापूर्वीच त्यांना अलुवा पूर्व पोलिस स्टेशनमध्ये नवीन नियुक्ती मिळाली होती. त्या आधी ते केरळ पोलिस दलातील स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी सुसाईड नोट किंवा तत्सम काहीही सापडलेले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलिस त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…
पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…
पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

