मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

मुंबई: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. शंकर कोळसे (वय ५६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायाच्या जुन्या दुखण्याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे. शंकर कोळसे हे त्यांची पत्नी रंजना यांच्यासोबत विक्रोळी पार्कसाईटमधील वर्षानगर येथे राहत होते. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे झोपायला वरच्या मजल्यावर गेले. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांना उठवायला गेल्या तेव्हा शंकर कोळसे यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीच्या मदतीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीने सांगितले की, शनिवारी मध्यरात्री २ वाजता जेव्हा त्यांना जाग आली होती, तेव्हा शंकर कोळसे आपल्या जागेवर झोपलेले होते. त्यामुळे रात्री दोननंतर त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. दीड वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता आणि त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. या दुखण्यामुळे ते खूप त्रस्त होते. याच आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असे पार्कसाईट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!