क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…

वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोहितला अटक केली आहे.

रोहितने एका भल्यामोठ्या लोखंडी पान्याने आरतीच्या शरीरावर 15 जोरदार घाव घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे नागरिक बघ्याच्या भूमिकेत राहिले. अनेकांनी या घटनेचे व्हीडिओ शुटिंग केले. मात्र, कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. आरतीचा मृत्यू झाल्यानंतरही रोहित तिच्या मृतदेहावर एकापाठोपाठ पान्याने घाव घालत होता. आरतीवर हल्ला करण्यापूर्वी रोहित , “क्यों किया ऐसा मेरे साथ?”, असे ओरडत होता. यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पान्याने हल्ला केला. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हादेखील तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही. यावेळी काहीजणांनी रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित त्यांच्याच अंगावर लोखंडी पाना घेऊन धावून गेला. तो शेवटपर्यंत शेजारीच असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसून आरतीच्या मृतदेहाकडे बघत राहिला.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, आरती आणि रोहित यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये बिनसल्याने आरती रोहितला टाळत होती. याचाच राग रोहित यादवच्या मनात होता. आरती वसई पूर्वेकडील एका खासगी कंपनीत कामाला होती. 8 जूनलाही रोहितने आरतीला मारहाण केली होती. त्याने आरतीचा मोबाईल फोडला होता. यानंतर आरतीने आचोळा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी रोहितला केवळ समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला.

पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरतीने आम्हाला रोहित आणि तिच्यातील प्रेमप्रकरणाविषयी सांगितले नव्हते. आम्ही रोहित विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता. 9 जूनला रोहितला पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. त्यावेळी रोहितांनी पोलिसांनी आपल्या भाषेत समज दिली. पोलिसी खाक्या दाखवताच आरतीने पोलिसांना थांबवले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने पोलिसांनी सांगितले. तरीही आम्ही 149 ची नोटीस देऊन रोहित यादव विरोधात कारवाई सुरु केली होती, अशी बाजू पोलिसांनी मांडली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…

पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!