चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार…

जळगावः लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलत बहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संबंधित धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलत भावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २७ वर्षीय महिला नातेवाइकाकडे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी ती कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओ तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या घरी चुलत भावाने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार करणे सुरूच ठेवले. त्याने अन्य दोन मित्रांनादेखील सोबत आणले व तिघांनी वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला.

दरम्यान, सातत्याने होणारा अन्याय सहन न झाल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी (ता. २३) चुलत भाऊ तसेच त्याचे दोन मित्र अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दत्तात्रय पोटे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video…

पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!