हिट अँड रन! दुचाकाली जोरात धडक; दोन चुलत भावांसह मित्राचा जागीच मृत्यू…

बुलढाणाः बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी (ता. १३) रात्री एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या हिट अँड रन घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. चिखलीहून उदयनगरला जात असताना हा अपघात घडला आहे. अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये प्रतिक भुजे (वय 25 वर्षे), प्रथमेश भुजे (वय 26 वर्षे) आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा समावेश आहे. यातील प्रतिक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ होते, तर सौरभ त्यांचा मित्र होता. हे तिघे चिखलीहून उदयनगर येथे जात होते, त्याचवेळी अमडापुर परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. या हिट अँड रन प्रकाराने अमडापुर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अमडापुर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!