पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ व २, गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवायांमध्ये ८४ लाखांचे अंमली पदार्थ, ४० किलो गांजा, ओजीकुश गांजा तसेच कोकेन सह महागडया कार जप्त केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकांनी २३/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ असे कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत होते. पोलिस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेले बातमीवरुन क्लोअर गार्डन सोसायटी, बिल्डींग नं.बी-३, नेलर रोड, कोरेगाव पार्क येथे
१) प्रणव नवीन रामनानी, वय १९ वर्षे, रा. बंडगार्डन पुणे
२) गौरव मनोज दोडेजा, वय १९ वर्षे, रा.कोरेगाव पार्क पुणे यांच्या ताब्यात एकुण ६७,०८, १०० /- रु. कि. चा ऐवज त्यामध्ये ०२ ग्रॅम ७८ मि. ग्रॅम कोकेन तसेच १३६ ग्रॅम ६४ मि.ग्रॅम ओजीकुश गांजा हा अंमली पदार्थ तसेच ते विक्री करीता आरोपी वापरत असलेल्या मिनी कुपर व ग्रँड व्हीटारा या महागडया कार तसेच दोन इलेक्ट्री वजन काटे व चार मोबाईल संच असा ऐवज जप्त करून त्यांचे विरुध्द कोरेगावपार्क पोस्टे गु.र.नं. १२/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii)(अ),२१ (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व स्टाफ असे लोणीकाळभोर पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरुन लोणकर वस्ती ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी
लोणीकाळभोर, पुणे येथे १) भरतकुमार दानाजी राजपुरोहीत, वय ३५ वर्षे, २) आशुसिंग गुमानसिंग दोघे रा. जि. जालोर राज्य – राजस्थान यांच्या ताब्यात एकुण १६,६७,८००/- रु. कि. चा ऐवज त्यामध्ये ४० किलो ३९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोस्टे गु.र.नं.४७/२०२५,
एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) ( क ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे. १, गणेश इंगळे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक उल्हास कदम, अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलिस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलिस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनिल नागलोट, प्रदिप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख, नुतन वारे यांनी केली आहे.

अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…

पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!