ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…

नांदेड: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आले. ‘जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचचले आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख,’ असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याने शुक्रवारी मोठी खळबळ उडाली होती.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपहरण आणि हत्येच्या विविध घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या हडपसर परिसरातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचीही अपहरण करून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं होतं. या दोन्ही घटना ताज्या असताना आता नांदेडमधून देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेड शहरातून शुक्रवारी (ता. १३) रात्री ९ च्या सुमारास ठाकरे गटाच्या शहर प्रमुख गौरव कोटगिरी यांचे बाफना टी पॉइंटजवळून अपहरण करण्यात आले. मात्र अपहरणानंतर अवघ्या तासाभरात आरोपींनी त्यांची सुटका केली. अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: कोटगिरी यांनी दिली.

५ ते ६ जणांनी चाकूचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले. कोटगिरी यांना अशाप्रकारे अज्ञातांनी उचलून नेल्यानंतर चालकाने तातडीनं फोन करून कोटगिरी यांच्या पत्नीला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोटगिरी यांच्या पत्नीने चालकासह इतवारा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

एकीकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना अपहरणानंतर अवघ्या तासाभरात आरोपींनी गौरव कोटगिरी यांना सोडून दिले. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्वत: कोटगिरी यांनी ही दिली. राजकीय नेत्यांविरोधात बोलू नका, अन्यथा जीवे मारू, प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार बंद कर, आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू, अशा प्रकारची धमकी दिल्याची माहिती कोटगिरी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!