घाटंजी पोलिसांचे शहरात पथसंचलन; पांढरकवडा, पारवा पोलिस अधिका-यांची उपस्थिती…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलिसांतर्फे घाटंजी शहरात पथसंचलन करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलिसांचे पथसंचलन पार पडले.

पथसंचलनात घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राठोड, पांढरकवडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पेंढारकर, पोलिस उप निरिक्षक अशोक मडावी, पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलिस उप निरीक्षक सुशिल शर्मा, पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, पोलिस उप निरीक्षक विनाश जाधव, पोलिस उप निरीक्षक दुर्गाप्रसाद मिश्रा, पारवा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक रायके, ठाणेदार यांचे रायटर दिनेश जाधव, घाटंजी पोलिस स्टेशन गोपनीय शाखेचे अमोल कोवे यांच्यासह पोलिस उप निरीक्षकासह ८ अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी व २५ होमगार्ड सहभागी झाले होते.

पथसंचलनाची सुरुवात घाटंजी पोलिस ठाण्यातून ते जूने बस स्थानक, गुप्ते दवाखाना, इंदिरा चौक, मस्जीद लाईन, शिवाजी चौक, अग्रसेन चौक मार्गे घाटंजी शहरातून पुन्हा घाटंजी पोलिस ठाण्यात विसर्जनाने झाली.

पथसंचलना दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करीत पोलिसांच्या शिस्तबद्ध संचलनाचे कौतुक केले आहे. सर्वांनी शांतता, सौहार्द आणि सुरक्षिततेत सण साजरा करावा, असे आवाहन घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशवराव ठाकरे यांनी केले आहे.

Viral News! शिक्षकाचं बेपत्ता झालेलं अख्ख कुटुंब सापडलं…

पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन…

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला पैशांसाठी पत्नी-मुलांकडून बेदम मारहाण…

बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…

पुणे! मनोज जरांगे यांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!