पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात राहात असलेल्या 11 वर्षांच्या मुलाला सावत्र आई आणि वडिलांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित सोसायटीमधील सजग नागरिक आनंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावत्र आई आणि वडिलांविरोधात भारतीय अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

खराडी परिसरातील साखरे गार्डियन – ईस्टर्न मिडोज सोसायटीचे सभासद व कार्यकर्ते आनंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, खराडी परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षांच्या बालकाला त्याचे वडील हार्दिक फालदु आणि सावत्र आई आरती शेरठीया यांनी बेलण, प्लास्टिक स्टंप तसेच हाताने मारहाण केल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आनंद शिंदे यांनी तत्काळ बालकाच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत खराडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मकरंद मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी, मुलाचा जबाब, शेजाऱ्यांकडून माहिती, तसेच वैद्यकीय तपासणी या सर्व बाजूंनी तपास सुरू असून आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल.’

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बालकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. चिमुकल्या मुलाला यापूर्वीही मारहाण झाल्याची घटना घडली होती. खराडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मेहत्रे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!