एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेली येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम युवतीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर युवतीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित युवतीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे.

बरेलीच्या दानिया नाझ नावाच्या युवतीने हर्षितशी लग्न केले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दानियाने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे. दानियाची वर्गमित्र हर्षित यादव नावाच्या युवकासोबत मैत्री झाली होती. दोघांच्या ओळखीचं रुपांतर पुढे प्रेमात झाल्यानंतर दानियाने एक आठवड्यापूर्वी हर्षित यादव याच्या सोबत मंदिरात लग्न केले. दानियाच्या वडिलांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी हर्षित यादव, त्याचे वडील आणि इतरांविरुद्ध बरेलीतील प्रेम नगर पोलिस ठाण्यात अपहरणासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दानिया हिने गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बरेलीच्या एसपींकडे मदत मागितली. दानियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, ‘पोलिसांनी हर्षित यादव आणि त्याच्या नातेवाईकांना अजिबात त्रास देऊ नये. मी खूप आनंदी आहे. मी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे.’ शिवाय, दानियाने तिच्या वडिलांना विनंती केली, ‘पापा, मी प्रौढ आहे. मी माझ्या स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे. मी खूप आनंदी आहे, म्हणून अपहरणाचा खटला मागे घ्या. मला आणि माझ्या सासरच्यांना त्रास देऊ नका. माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर बोट ठेवण्यापूर्वी, स्वतःच्या कुटुंबाकडे पाहा. माझ्या कुटुंबाचा यात काही दोष नाही. माझ्या कुटुंबाला यात सामील करू नका. मी चूक केली आहे, पण माझ्या कुटुंबाने नाही. त्याने मला खूप चांगले संस्कार दिले आहेत. जर मी त्यांचे काही वाईट केले असेल तर तुम्ही मला दोष द्यावा, कुटुंबातील सदस्यांना नाही.’

दरम्यान, पोलिसांनी दानियाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे हर्षित यादवसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच न्यायालयासमोर दानियाचा जबाब नोंदवून कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…

डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!