
तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…
तुळजापूरः तुळजापूर शहरात एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर शहरातील पोलिस कॉर्टर एस.टी. कॉलनीत सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी होती.
ओंकार कांबळे हा युवक तिला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, अशी धमकी ओंकार कांबळे याने सारिकाला दिली होती. तसेच तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला बंदुकीने मारेन, असेही त्याने सारिकाला धमकावले होते. या सगळ्या त्रासाला कंटाळून सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलिस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पुर्वीचाही गुन्हा आहे दाखल आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…
वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…
चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले…
महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…
सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

