क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

सांगली : अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या गुप्तांग तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्या प्राण्याचे गुप्तांग तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचा पोलिस पुडील तपास करत आहेत.

संबंधित तीन घोड्या सांगलीतील भारती हॉस्पिटलसमोर येथे बेवारस रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले. ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ किशोर पोळ यांनी त्वरित पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची माहिती फोन करुन दिली आणि पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन फिर्याद दिली.

ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय डॉ. राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, श्री. गोरखनाथ कुराडे यांच्यामार्फत घोडींना भूल देऊन संबंधित तांब्याच्या तारा काढून घेतल्या. डॉक्टरांनी तांब्याच्या तारा काढताना वेदनाशामक इंजेक्शनही दिले आणि त्यांना त्रासातून मुक्त केले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

दरम्यान, सांगली शहरामध्ये रस्त्यावर सर्वत्र घोडे फिरताना दिसतात. त्यांचा शर्यतीमध्ये पळवण्यासाठी वापर होतो. शर्यत झाली की त्यांना रस्त्यावर चरण्यासाठी असे बेवारस सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने मादी जास्त असतात. रस्त्यावर असे सोडल्यामुळे त्यांना इतर नर घोड्यांकडून गर्भधारणा होते आणि त्या शर्यतीमध्ये काही महिने पळू शकत नाहीत. म्हणून त्याना त्यांच्या मालकांकडून अशा अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्या योनीला वेगवेळ्या पद्धतीने शिवले जाते, जेणेकरुन नर घोड्याकडून गर्भधारणा होऊ नये. परंतु, असे कृत्य करणे हे लाजिरवाणे आणि माणुसकीला काळिमा फासणारे आहे.

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!