विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

कानपूर (उत्तर प्रदेश): एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. पण, कुशाग्र या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत.

कानपूर येथील कुशाग्र हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नव्हता. काही अज्ञातांनी व्यापाऱ्याच्या घरी ३० लाख रुपयांची खंडणी देण्याची चिठ्ठी फेकली आणि फरार झाले. घाबरलेल्या कुटुंबाने थेट पोलिस ठाणे गाठले आणि मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. अपहरणाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलली. स्वत: घटनास्थळी पाहणीसाठी सहपोलिस आयुक्त पोहचले. मात्र, सकाळी कुशाग्रचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

कुशाग्रचा मृतदेह त्याची ट्यूशन टिचर रचिताच्या घरी स्टोअर रुममध्ये आढळला. कुशाग्रची हत्या करणारा अन्य कुणी नसून रचिताचा प्रियकर प्रभात होता. प्रभातला कुशाग्रचे आणि रचितासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची शंका होती. त्यातूनच त्याने कुशाग्रची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

कुशाग्रची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचले. खंडणीसाठी कुशाग्रची हत्या झाल्याचा बनाव रचला. अपहरण, खंडणी त्यातून पोलिसांचा तपास भरकटेल असे प्रभातने रणनीती आखली. रचिताच्या घरी कुशाग्रची हत्या करून प्रभातने आधी त्याची स्कूटर घेतली, त्यानंतर आर्यनला सोबत घेत त्याची नंबरप्लॅट बदलली. त्यानंतर ३० लाखांची खंडणी मागणारी चिठ्ठी कुशाग्रच्या घरी फेकली आणि फरार झाले. चिठ्ठीत काही धार्मिक घोषणाही दिल्या होत्या जेणेकरून पोलिसांचा गोंधळ होईल.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, काही जणांची चौकशी केली. त्यात कुशाग्रची टीचर रचिताचे नाव समोर आले. रचिता आधी कुशाग्रच्या घरी येऊन त्याला शिकवत होती. मात्र, घरच्यांनी तिला काढून टाकले होते. रचिताची चौकशी केल्यावर प्रभातचे नाव समोर आले. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण सत्य समोर आले.

कुशाग्रचा मृत्यू संध्याकाळी साडे पाच वाजता झाला होता. खंडणीची मागणी केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी होती. सीसीटीव्ही पाहिले असता कुशाग्र हा रचिताच्या घरी गेला होता. त्यानंतर रचिताचा मित्र प्रभात घरात गेला. त्याचे घर रचिताच्या घराजवळच आहे. दोघे काही वेळाने बाहेर येतात. परंतु, कुशाग्र दिसत नाही. त्याच काळात घरी हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!