लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

तनु गुर्जर (वय 20) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ जारी केला होता की, त्यामध्ये म्हटले होते की….
नमस्कार,
माझे नाव तनु गुर्जर आहे, माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे, माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे. मी आदर्श नगरची रहिवासी आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे एका मुलावर खूप प्रेम आहे. आमच्या नात्याला सहा वर्षे झाली आहेत. सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला. आता ते मला रोज मारतात. तसेच जीवे मारण्याची धमकी देतात. मला प्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव भिकम मावई आहे. तो आग्रा येथील रहिवासी आहे. माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील. कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात, पण मी करू शकत नाही.

घरात तनूच्या लग्नाची तयारी सुरू होती. मंगळवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास अचानक रागाच्या भरात महेश आला आणि त्याने तनुच्या तोंडावर पिस्तुलाने गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत पोहोचताच त्यांना त्यांची मुलगी तनूचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. वडील आणि चुलत भाऊ राहुल पिस्तुल घेऊन उभा होता. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तात्काळ सीएसपी महाराजपूर नागेंद्र सिंग सिकरवार घटनास्थळी पोहोचले तेव्हा महेश आपले पिस्तूल आणि पिस्तूल हवेत फिरवत होता. तनुला लग्न करायचं नव्हते. तिच्या संमतीशिवाय हे लग्न ठरले होते. यावरून हा संपूर्ण वाद आहे. बुधवारी हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार होता.

आरोपी महेश सिंग तापट स्वभावाचा होता आणि त्याच्या मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला हे त्याला आवडत नव्हते. वडील महेशने यापूर्वी अनेकदा समजावून सांगितले होते. मंगळवारी रात्री तो आला असता त्याचा मुलीशी वाद झाला. रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले. खून केल्यानंतर तो कुठेही पळून गेला नाही. सीएसपी नागेंद्र सिंह सिकरवार यांनी सांगितले की, आरोपी वडील पकडले गेले आहेत, तर चुलत भाऊ राहुल फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…

पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…

प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…

एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!