भेसळयुक्त सप्लिमेंट्सच्या विक्रीला आळा घाला; सुशील ठोंबरे यांची प्रशासनाकडे मागणी…

पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब लक्षात घेता बाजारात विक्री होणाऱ्या भेसळयुक्त, बनावट, निकृष्ट दर्जाच्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्सवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे पुणे जिल्हा सचिव सुशील ठोंबरे यांनी केली आहे.

सध्या प्रोटीन पावडर, मल्टिव्हिटॅमिन्स, न्यूट्रास्युटिकल्स, फॅट-बर्नर व इतर आरोग्यविषयक सप्लिमेंट्सचा वापर वाढत आहे. मात्र, काही उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि लेबलवरील माहितीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने अशा उत्पादनांची अचानक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शिवाय, नियमबाह्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, घटक, उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख याबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात यावे, अशीही मागणी ठोंबरे यांनी केली.

‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळयुक्त उत्पादनांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळू नये. संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,’ असे सुशील ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
– सुशील ठोंबरे, पुणे जिल्हा सचिव
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद

धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…

पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

पुणे! येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी अन् पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका…

हिंजवडी IT पार्कमध्ये NSG अन् अमेरिकेचे कमांडोचा ताफा अचानक धडकला अन्…

‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर अन् पुण्यातील व्यावसायिकाची कोट्यावधींची फसवणूक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!