
लग्नाला काही महिने बाकी असतानाच युवक-युवतीचा आढळला मृतदेह…
कोची (केरळ) : लग्नाला अवघे काही महिने बाकी असतानाच कासारगोड येथील युवती आणि कन्नूर येथील तिच्या होणाऱ्या पतीचा मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. युवतीची बॉडी कर्नाटकातील राहत्या घरी, तर तरुण केरळमधील एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळला. लग्नाला अवघे काही महिने बाकी असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मूळ केरळच्या कासारगोडमधील पल्लीकारा येथील कूटक्कानीची रहिवासी असलेली पी अनुश्री (वय २५) कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत कार्यरत होती. तिचा मृतदेह हुन्सूर येथील तिच्या निवासस्थानी आढळला. हुन्सूर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
View this post on Instagram
अनुश्रीचे होणारे पती व्ही अमल (वय २६) यांचा मृतदेह केरळातील एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये आढळला. ते कन्नूरमधील अंबालाथट्टू येथील रहिवासी होते. एर्नाकुलममधील एम जी रोडवरील त्याच बँकेच्या शाखेत ते काम करत होते. ते जवळच मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, ‘फ्लॅगशिप मलबार हॉटेल’मधील खोली क्रमांक ३०५ मध्ये अमल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. ही घटना बुधवारी सकाळी ८.२३ ते १० या वेळेत घडली. पोलिसांनी बीएनएसच्या कलम १९४ अन्वये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. अनुश्रीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अमलने लॉजमध्ये चेक इन केले असावं, त्यानंतर आयुष्याचा शेवट केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अनुश्री आणि अमल यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचे लग्न २६ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आले होते. कन्नूरमधील अमल यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे शनिवारी घरी आले होते आणि रविवारी तिथून निघून गेले होते. अमल यांचे वडील सुधाकरन या जोडप्यासाठी नवीन घर बांधत होते, असेही शेजाऱ्यांनी सांगितले.
अमलजवळ कोणतीही मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडलेली नाही आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण व त्यामागची परिस्थिती सखोल तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मोबाईल फोनचीही पुढील तपासणी केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…
नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…
धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…

