येरवडा कारागृहात व्यसन जनजागृतीसाठी ‘मोहजाल’ नाटीका सादर…

पुणे (संदीप कद्रे): कारागृहात बंद्यांमध्ये व्यसनाप्रती जनजागृती होऊन कारागृहाबाहेर गेल्यानंतर व्यसनाच्या आहारी जावू नये व एक उज्वल भविष्य निर्माण करु शकतो ही भावना वृध्दींगत होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रधर्म फाऊंडेशन आणि राधिका क्रिएशन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने युवा कलावंतांनी हिंदी नाटीका ‘मोहजाल’ व्यसनमुक्ती समुपदेशन यावर आधारीत अतिशय उत्कृष्ट संदेशात्मक कार्यक्रम बंद्यांसाठी सादर केला.

सदर संस्थेच्या २५ युवक-युवतींच्या सहभागातुन बदलत्या सामाजिक परिस्थितीत भोगविलास वृत्ती वाढत आहे, त्याप्रमाणे अनेक युवक-युवती नशेच्या अधीन झाले आहेत. त्याची कारणमीमांसा व उपाययोजना या नाटीकेव्दारे सादर करुन सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर उपक्रमाच्या माध्यमातुन बंद्यांमध्ये व्यसनाप्रती जनजागृती होण्यास मदत झाली आहे. या कार्यक्रमास किशोरवयीन बंद्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन दाद दिली. प्रा. प्रसन्न शेर्बेकर लिखित या नाटिकेचे दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले असून, निर्मिती राष्ट्रधर्म फाऊंडेशनचे संचालक अनिरुध्द् तोडकर आणि राधिका क्रिएशन्सच्या सुत्रधार अभिनेत्री राधिका देशपांडे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन कुणाल आनंदम आणि सौरभ मसराम यांचे आहे.

सदर कार्यक्रम अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदार सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतुन व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली १०.१२.२०२३ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृह येथे आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रम सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पल्लवी कदम, उपअधीक्षक, रविंद्र गायकवाड, उपअधीक्षक, मंगेश जगताप, उपअधीक्षक, आनंदा कांदे, वरीष्ट तुरुंगाधिकारी, आर खिलारी, पी. पालोदकर, महिला तुरुंगाधिकारी, व्ही. के. खराडे, सुभेदार यांचे उपस्थितीत पार पडला.

येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!

कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!